मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार येत्या 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या दिवशी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना खेळला जाईल. दरम्यान, एक मोठी बातमी येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळल्यानंतर एका खेळाडूने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार खेळाडू मार्कस स्टॉइनिस आहे, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर, संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल, जी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल. दरम्यान, मार्कस स्टॉइनिसने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मार्कस स्टॉइनिसने ऑस्ट्रेलियासाठी 74 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचाही तो भाग होता. पण, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे तो सध्या टी-20 क्रिकेट खेळत राहील. म्हणजेच तो लीगमध्ये खेळताना दिसेल.
मार्कस स्टॉइनिस निवृत्तीबद्दल काय म्हणाला?
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत्यानंतर मार्कस स्टॉइनिस म्हणाला की, ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा प्रवास खूप छान राहिला. हा निर्णय सोपा नव्हता, परंतु मला वाटते की एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची आणि माझ्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. मार्कसने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 71 सामन्यांमध्ये 1495 धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये फक्त एक शतक केले आहे, ज्यामध्ये त्याने नाबाद 146 धावा केल्या आहेत. जरी त्याने सहा अर्धशतके ठोकली आहेत. मार्कस त्याच्या संघासाठी गोलंदाजीतही त्याचे कौशल्य दाखवतो. त्याने 48 विकेट्सही घेतल्या आहेत.