Spread the love

आयुक्तांच्या आश्‍वहासनानंतर आंदोलन स्थगित : आज महापालिकेत बैठक

इचलकरंजी/ महान कार्य वृत्तसेवा
शहरातील फासेपारधी समाज अपेक्षित आहे. याची मला कल्पना आहे. त्यांचे काही  वर्षापासून प्रलंबित प्रश्त टप्प्याने मार्गी लावले जाती अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. यानंतर समाज संघटनेचे अध्यक्ष मोहन काळे यांनी आंदोलन स्थगीत करत असल्याची घोषणा केली. दरम्यान बुधवार 12 रोजी आयुक्तांनी त्यांच्या प्रश्‍नासंदर्भात संबधीत विभाग प्रमुखांची बैठक आयोजीत केल्याची माहिती काळे यांनी दिली.
इचकरंजी शहरात आदिवासी फासे पारधी समाजाच्या वॉर्ड क्रमांक 20 मध्ये दोन झोपडपट्ट्या आहेत. या ठिकाणी कोणत्याही सामजीक सुविधा पुरवल्या जात नाहीत. येथील घरकुलांना कर आकारणी केली जात नाही. त्यामुळे त्यांना हक्काची घरे बांधण्यास अडचणी येत आहेत. ठक्कर बाप्पा योजनेतून समाजाच्या विकासासाठी 40 लाख रुपयांचा वर्षाला निधी मिळतो. मात्र त्यातील दमडीही खर्च केली जात नाही. प्रत्येक वर्षी निधी येतो. मात्र खर्च न केल्याने परत जातो. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरु आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी समाजाने मोहन काळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. यापार्श्‍वभूमीवर सोमवारी आयुक्त पल्लवी पाटील यांनी समाजाशी संवाद साधत विविध प्रलंबित प्रकरणावर चर्चा केली. यावेळी राजू बोंद्रे, रितेश पवार, मोहन काळे, सुरेश चव्हाण, शंकर काळे, दीपक चव्हाण, परसू चव्हाण, बाबला काळे, सुनिल चव्हाण, बाबू काळे आदी उपस्थित होते.
आणि त्याच विषयावर बुधवारी दुपारी 12 वाजता बैठक आयोजीत करत असल्याचे सांगितले आता पहावे लागले या बैठकीत काय निर्णय होतो.

अपेक्षा ठेवून आहोत.
आयुक्त पल्लवी पाटील या सकारात्मत भूमिकेत दिसता. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.
मोहन काळे, अध्यक्ष फासे पारधी समाज संस्था