
शालेय विद्यार्थ्यांसाठी

गुरु वचन
सर्वोत्कृष्ट भक्ती मार्ग – आचार्य दिव्यचेतनानंद
विद्वानांनुसार, ईश्वर प्राप्तीचे 3 मार्ग आहेत-ज्ञान, कर्म व भक्ती. खरंतर हेच ज्ञान आहे की, ज्या माध्यमातून ईश्वर कोण आहे? हे आपण जाणतो. ज्ञानाचा संगह आपल्या मेंदूत असतो व निर्विवादपणे हे आपणास ईश्वरकडूनच मिळते. मानवाचा मेंदू छोटा असतो मग अशा स्थितीत तो ईश्वराला कसा जाणू शकेल? हा प्रश्न निर्माण होतो. वास्तवात मेंदूत असलेल्या ज्ञानानेच हे शक्य होऊ शकते. ज्ञानामुळे मन तृप्त होते. श्रीआनंदमूर्तिके यांच्यानुसार, जोपर्यंत मानवात ज्ञानाची जाणीव राहिल तोपर्यंत त्याने ज्ञान ग्रहण करत राहिले पाहिजे. एका मर्यादेनंतर आपल्या ज्ञानाची भूक मंदावते कारण तोपर्यंत आपले लक्ष्य ईश्वर प्राप्ती होते.
काही विद्वान मानतात की, कर्मामुळे ईश्वर प्राप्ती होते कारण कर्म न करता मनुष्य एक क्षण सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून आपण कर्म करत राहिले पाहिजे पण कर्म चांगले असायला हवेत. गीतेत प्रभू श्रीकृष्णाने मानवास कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहण्याचा सल्ला दिला आहे. सांगण्याचे तात्पर्य धार्मिक व आध्यात्मिक जगात ज्ञानाला जेवढी किंमत आहे त्यापेक्षा कमी कर्माची नाही. विद्वान म्हणतात की, जर निर्मळ भावाने ईश्वराची भक्ती केली तर ते सहज मिळतील. खरंतर भक्ती मार्गाची कास मोठ-मोठ्या ज्ञानवंतांनी चोखाळली आहे. आपण सर्व मानतो की, सृष्टीची निर्मिती ईश्वरानेच केली आहे.
म्हणून जगातील प्रत्येक जीव परमात्म्याचे संतान आहे. जर आपण परमात्माला प्रसन्न करु इच्छित असाल तर त्यांची संतान म्हणजे प्रत्येक जीवप्रती प्रेम-भाव ठेवा व यासाठी आपण मानवसेवा व समाजसेवा केली पाहिजे तसेच निराधारांना आधार दिला पाहिजे. मानवसेवा करताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हा सर्व खटाटोप ईश्वर प्राप्तीसाठी केला जात आहे. खरंतर हीच भक्ती आहे. त्यामागे दुसरे कुठलेही कारण नाही. जर भक्तीभाव निर्माण झाला तर ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळाला, असे समजा.
उपदेशकथा
एकदा संगीतकार नौशाद सेटवर आले आणि त्यांनी भराभर सूचना करण्यास सुरुवात केली. सोफा या दिशेला ठेवा, फ्लॉवर पॉट इकडच्या टेबलावर ठेवा. गालीचा बदला. त्याऐवजी दुसऱ्या रंगाचा गालीचा आणा. सारेजण चकित होऊन पहायला लागले. दिग्दर्शक मेहबूबखान यांना मात्र याचं कारण कळून चुकलं. आदल्या दिवशी रेकॉर्डिंग रूममध्ये नौशाद साहेबांना गाण्याबद्दल त्यांनी अशाच सूचना दिलेल्या होत्या. त्यावेळी संगीतकार नौशाद यांनी त्यांना प्रत्युत्तर केलं नव्हतं. सर्व सूचना निमूटपणे ऐकल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच्या या कृतीचा अर्थ फक्त मेहबूबखान यांनाच समजला. मोठ्या मनाच्या मेहबूब खान यांनी आपली चूक मानली. खिलाडूपणानं स्वीकारली. पुढे दोघांची मैत्री प्रदीर्घकाळ टिकली. त्यानंतर मेहबूब खाननी संगीताच्या कामात नौशाद साहेबांवर पूर्ण विश्वास टाकला.
कथा उपदेश : आपल्या कार्यक्षेत्रात काम करीत राहावं. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नये.
इतिहासात आजचा दिवस – १० मार्च
अंतरराष्ट्रीय
1876 – ग्रॉम बेल ने थॉमस वॉटसनला जगाची प्रथम दूरध्वनी केली.
1906 – फ्रांसमध्ये कोळसा खाणीत स्फोटात 1,060 लोक ठार झाले.
1945 – जपानने वेतनामला स्वतंत्र घोषित केले.
1968 – न्युझीलंडचा वेलींगटनमध्ये फेरी नाव बुडाली, त्यात 200 लोक ठार झाले.
2008 – मलेशियात पंतप्रधान अब्दुल्ला अहमद बदावी यांनी विरोधी पक्षाची राजीनाम्याची मागणी धुडकावत आगामी पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी शपथ ग्रहण केली.
राष्ट्रीय
1939 – हैद्राबादमध्ये दरड कोसळल्याने 17 गावांना नुकसानीची झळ पोहचली.
2008 – साखरेचे दर घटल्याने संकटात आलेले साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांना 2482 कोटींचा निधी मंजूर केला.
2008 – त्रिपुरात मुख्यमंत्री माणिक सरकारच्या नेतृत्वात माकपाप्रणित डाव्या आघाडी सरकारने सलग चौथ्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारला.
जन्म
1452 – सीसीलेचे राजा फरडीनंद दुसरा यांचा जन्म.
1503 – जर्मन योद्धा फरडीनंद पहला यांचा जन्म.
1776 – कॅनाडीची प्रथम महिला पंतप्रधान अवरील ’कीम’ कॅम्पबेलचे जन्म.
निधन
0037 – रोमन योद्धा टीबेरीयस कलाडीयस नेरो याचे निधन.
1826 – पोर्तगालचे राजा जोहन पाचवा यांचे निधन.
1973 – बरमुडाचे राज्यपाल सर रिचर्ड शार्पल्स् यांचे निधन.