हातकणंगले पोलीस ठाण्यातील दोन नंबर अधिकाऱ्याचा प्रताप
कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा
अमली पदार्थ विरोधात जिल्ह्यात पोलिसांकडून धडक कारवाया सुरू झालेल्या आहेत. अनेक ठिकाणच्या कारवाया ऑन पेपर येत असताना हातले पोलिसांनी एका गावात गांजाचा धूर सिताफिने विझवल्याची चर्चा फेटा वाघात दबक्या आवाजात सुरू आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात गांजा सापडत आहे. वरिष्ठांची शाब्बासकी मिळवण्यासाठी अशा कारवायांसाठी पोलीस ठाण्यांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे. इचलकरंजीत कारवाई झाल्यानंतर हातकणंगले पोलिसांनीही येथूनच जवळच असलेल्या एका गावात तीन ते चार किलो गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्याच्या घरावर बुधवारी रात्री रेड टाकली. पंचनामा झाला आणि रात्री उशिरा संशित आरोपी सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यात आले. हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या एका दोन नंबर पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याने हा प्रताप केले समजते. विशेषतः अमली पदार्थ तस्करी जवळ बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीही त्या अधिकाऱ्याने अशा स्वरूपाच धाडस केलं. त्यामुळे यापूर्वी असे किती गुन्हे न कारवाई करता आरोपींना अभय दिलेले असेल याची कल्पना न केलेली बरी, अशी दबक्या आवाजात चर्चा पेठा भागात आहे. दरम्यान तंबाखूजन्य पदार्थ विक्री करतो म्हणून पेठा भागातीलच एका पान टपरी चालकास पंधरा दिवस जेलची हवा दाखवली.
त्यापेक्षा गांजा प्रकरण गंभीर असतानाही पोलिसांनी संशितावर मेहरबानी केलीच कशी, हा संशोधनाचा विषय बनलेला आहे. आता पहावे लागेल वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक काय ॲक्शन घेतात.
