हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संघटकपदी नियुक्ती
मौजे वडगाव / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे)
स्वर्गीय लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांच्या विचारांचा सच्चा पाईप असलेल्या मौजे वडगाव, तालुका हातकणंगले येथील सतीश वाकरेकर यांच्यावर जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संघटकपदी नियुक्त करून त्यांना शिवसेना आणि माने परिवारावर असलेल्या निष्ठेच फळ मिळाले आहे. शिवसेना उपनेते खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्त पत्र देण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, माजी आमदार सुजित मिणचेकर उपस्थित होते. मौजे वडगाव सारख्या छोट्याशा गावात शिवसेनेचा विचार रुजवत सतीश वाकरेकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोठं काम केलं होतं. सातत्याने त्यांनी ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर अनंत दिघे, लोकनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं. आता याही पुढे जात त्यांना संपूर्ण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नेत्यांचा विश्वास सार्थ ठरणार
आमचे नेते खासदार धैर्यशील माने आणि जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू
सतीश वाकरेकर संघटक (शिवसेना)हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
