देश

Spread the love

'बिग बी'कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

मुंबई 4 मे (पीएसआय)

बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या दहा किमी अंतराचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे मुंबईला पश्चिम उपनगराला जोडणे शक्य झाले आहे. अनेकजण या कोस्टल रोडवरुन प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातच आता अमिताभ बच्चन यांनी देखील नुकतेच कोस्टल रोडवरुन प्रवास करत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचे देखील कौतुक केले आहे. त्यांच्या या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल अगदी फिल्मी स्टाईल रिप्लाय दिला आहे.

मुंबई ते कांदिवली असा या कोस्टल रोडचा प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा 12,721 कोटी रुपये आहे. नुकतेच लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता कोस्टल रोडच्या कामाचे देखील कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘ढ 4999 ड्ढ  जह ! इूे !! ुशपीं ेीं ुेीज्ञ .. रषींशी डशर ङळपज्ञ ेप ेीं उेरीींरश्र ठेरव रपव र्ढीपपशश्र र्ीपवशीर्सेीीपव .. गतझऊ, र्गीर्ही ेीं चरीळपश ऊीर्ळींश , 30 ाळपी .. !! वाह ! क्या बात है! स़ाफ सुथरी नयी बत्रिढया सत्रडक, कोई रुकावट नहीं.’

अमिताभ यांच्या ट्विटपेक्षा यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी फिल्मीस्टाईलमध्ये म्हटले आहे की, ”झरीरारीिर, झीरींळीहींहर, अर्पीीहरीरप, धश ळीी ीरीज्ञरी ज्ञश ींशशप ीींरालह हरळ !” श ुे ररवरीीह हरळप क्षळपीश र्हीा इहरीरींळूेप ज्ञर ज्ञरश्र लरपररींश हरळ”ः, अमिताभ जी तुम्ही तुमच्या प्रवासाचा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल खूप आभार. मुंबई आता अपग्रेड होतेय आणि आम्ही मुंबईकरांसाठी वेळ वाचवणाऱ्या प्रवासाचा अनुभव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.

लोकसभा निवडणुकीतही शुक्लकाष्ठ थांबेना! ईडीकडून नवव्यांदा अरविंद केजरीवाल यांना समन्स

नवी दिल्ली,17 मे (पीएसआय)

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ईडीनं नवव्यांदा मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स पाठविलं आहे. सूत्राच्या माहितीनुसार ईडीनं आपच्या संयोजकाविरोधात नव्यानं गुन्हा दाखल केला. त्यामुळे आपकडून आज ईडीच्या कारवाईविरोधात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाèया ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला चौकशीसाठी मुख्यालयात बोलाविलं आहे. याआधी ईडीनं 8 समन्स पाठवले आहेत. ईडीनं वारंवार समन्स पाठवूनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चौकशीला हजर राहिले नाहीत. या प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर राहावं लागलं. न्यायालयानं केजरीवाल यांना जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणी 1 एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीकडून केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न असल्याचा आम आदमी पक्षानं यापूर्वी आरोप केला.

आपच्या आमदारांना 25 कोटींची ऑफर- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 18 फेब्रुवारी रोजी भाजपावर गंभीर आरोप केला. भाजपाकडून इतर पक्षांचे नेते आणि आमदार फोडण्यात येत असल्याचा केजरीवाल यांनी आरोप केला. त्यांनी म्हटले, ’’’ भाजपामध्ये सगळे का जात आहेत? ईडी आणि पीएमएलए रद्द केला तर निम्म्यांहून अधिक लोक भाजपा पक्ष सोडून जातील. भाजपानं ईडी आणि पीएमएलएची भीती दाखवणे बंद केले तर भाजपाचे निम्मे नेते पक्ष सोडतील. भाजपाच्या नेत्यांनी आपच्या आमदारांना 25 कोटींची ऑफर दिल्याचाही केजरीवाल यांनी दावा केला होता.

मुख्यमंर्त्यांवर कारवाईची टांगती तलवार- आपचे नेते सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनी मनी लाँड्रिग प्रकरणात तुरुंगात जावं लागलं आहे. ईडीकडून सतत समन्स येत असल्यानं अरविंद केजरीवाल यांच्यावरदेखील कारवाईची टागंती तलवार आहे. ईडीनं बीआरएस आमदार कविता यांच्या घरावर शुक्रवारी छापा टाकला. त्यानंतर कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी बीआरएस आमदार कविता यांना अटक केली. प्राप्तिकर विभागासह ईडीच्या अधिकाèयांनी त्यांच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.