आरोग्य संपदा
घरात असलेला बटाटा तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी बुटी!

भारतात सर्वाधिक कोणती भाजी खाल्ली जात असले तर ती बटाटाच्या भाजी आहे. फक्त बटाट्याची भाजी नाही तर बटाट्याचे सगळेच प्रकार खाण्यास लोक पसंती देतात. बटाटा कोणत्या ना कोणत्या भाजीत मिसळून लोक खातात. इतकंच काय तर उपवासात देखील लोक बटाट्याचा प्रकार असतोच. सगळ्यांना आवडणारा बटाटा तुमच्या आरोग्यासाठी किती फायदे कारक आहे हे तुम्हाला माहितीये का?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पूर्वीच्या काळात आपला जीव वाचवण्यासाठी बटाटे खाल्ले जात होते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार, बटाट्यात पोषक घटक असतात जे स्कर्वी या रोगापासून शरीराचं संरक्षण करतात. हा आजार इतका भयानक आहे की शेवटच्या टप्प्यात पोहोचला तर मृत्यू होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया बटाटे खाण्याचे सर्व फायदे.
वजन कमी करण्यासाठी बटाटे खावेत?
बटाटा हे ग्लूटेन फ्री आहे, ज्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय खाऊ शकतो. कारण, ग्लूटेन पदार्थ खाल्ल्यानं काही लोकांना पोटदुखी, पोट फुगणे, जुलाब, बद्धकोष्ठता आणि त्वचेवर पुरळ उठणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
लवकर भूक लागत नाही
बटाट्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते खाल्ल्यानं पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे खूप वेळ भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करू शकता. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की बटाटे जास्त तेलात शिजवू नका. याउलट उकडलेले बटाटे खाल्ल्याने वजन लवकर कमी होऊ शकते.
प्रोटीन ते फोलेट पर्यंत हे गुणधर्म आहेत
बटाट्यात भरपूर पोषक तत्वे असतात. 1 बटाटा खाल्ल्यानं तुम्हाला पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स, ङ्गायबर, कार्ब्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, मँगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फोलेट मिळू शकतात.
डायबिटीजसाठी फायदेशीर
मधुमेहाचा रुग्णांना बटाटे खाण्यास अनेकदा मनाई केली जाते . पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका संशोधनात बटाटा हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. या स्टडीत असे म्हटले आहे की, बटाट्यामध्ये स्टार्च असते आणि त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव वाढतो आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राहते.