Spread the love

काँग्रेसमध्ये प्रवेश करत दोन वाडकरांनी केला राम राम

कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले शहरात एकसंघ असलेल्या भाजपला गळती लागण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी हातकणंगलेतील भाजपाच्या प्रदीप वाडकर, राजू वाडकर यांनीकाँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरपंचायत निवडणुकीत हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
 सर्वत्र स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. पक्ष बळकटीसाठी नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. सर्वत्र राजकीय वातारवण तापत असतानाच हातकणंगले तालुक्यात भाजपला खिंडार पडण्यात महाविकाश आघाडीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे दावेदार दीपक वाडकर याांनी हातकणंगले तालुक्याचे भाजप विशेष कार्यकारी अधिकारी प्रदीप वाडकर आणि राजू वाडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश देवून भाजपला धक्का दिला आहे.  विधानपरिषदेचे गटनेते काँग्रेस आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला आहे
 स्थानिक स्वराज्य निवडणुकीमुळं राजकीय वातावरण तापत आहे. पक्ष बळकटीसाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून बैठकाचं सत्र सुरु आहे. महानगरपालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीनं रणनिती आखली जात आहे.
 कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात पक्षात इनकमिंग सुरु झालं असून याची सुरवात हातकणंगलेतून झाली आहे.   या पक्ष प्रवेशावेळी गोविंद दरक, माजी पंचायत समिती सदस्य दीपक वाडकर, डॉ. अभिजीत इंगवले, बाळासो वरुटे, चारुदत्त हापटे, प्रकाश खांडेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते.