
पुलाची शिरोली(प्रतिनिधी)विद्याधर कांबळे
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील विहिरीत शिये येथील युवकाचा संशयास्पद मृतदेह सोमवारी सायंकाळी सापडल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यानंतर व ओळख पटविल्यानंतर फिरोज खानसो मुजावर, वय ४३ ,रा.हनुमान नगर शिये,ता.करवीर असे या युवकाचे नाव असल्याचे समजले.या
मयत युवकाच्या डोक्यावर ,पाठीवर जखम आढळून आली आहे.तसेच तोंडात कापडाचा बोळा आढळून आल्याने घातपाताची शक्यता बळावली होती. करवीर चे उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अव्हेशन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,शिरोली एमआयडीसी पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी आज दिवसभर शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन ला तळ ठोकला होता.मृत फिरोज च्या नातेवाईकांकडे व संशयित व्यक्तीकडे कसून चौकशी केली आहे.
गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिरोज चा घातपात हा जवळच्या नातेवाईकानेच केला असल्याचे समजते.
