Spread the love

जयसिंगपूर :
कवठेसार व कोथळी येथे विविध विकासकामांचा एकत्रित लोकार्पण व शुभारंभ सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सोमवार (दि. १६) पार पडला. कवठेसार येथे ७८ लाख २८ हजार रुपये निधीतून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, तर कोथळी येथे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ते १० लाख रुपयांच्या निधीतून काँक्रिटीकरणचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कवठेसार येथे मातोश्री शेत पानंद रस्ते योजनेतून डोंबिरी पानंद रस्त्यासाठी १९ लाख १५ हजार रुपये, समडोळी पानंद रस्त्यासाठी १९ लाख १३ हजार रुपये, जामा मशीद परिसरातील काँक्रिटीकरणासाठी १० लाख रुपये, श्री १००८ पार्श्वनाथ जैन मंदिर परिसरातील काँक्रिटीकरणासाठी १० लाख रुपये, छत्रपती शिवाजी चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराच्या मुरमीकरणासाठी १० लाख रुपये, तर आरोग्य उपकेंद्रात आरसीसी खोली बांधकामासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्राधान्य आहे. रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा आणि विविध सुविधांच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोथळी येथे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत नंदगाव वसाहत, बालाजीनगर आणि दानोळी रस्ता परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण कामांचा आमदार यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांची रस्त्यांची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच उर्वरित रस्त्यांच्या कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार यड्रावकर यांनी नंदीवाले समाजबांधवांना दिली.
कवठेसार येथील कार्यक्रमास सभापती मिलिंद कुरणे, सरपंच पोपट भोकरे, उपसरपंच स्वाती संतोष भोकरे, ग्रामपंचायत अधिकारी अतुल कांबळे, सुभाष माने, रमेश मगदूम, संतोष भोकरे, भरत तेरदाळे, बाबासाहेब मगदूम, भीमराव पाटील, ओंकार पाटील, यशवंत गुरव, विजय नांद्रेकर, माणिकचंद भोकरे, जवाहरचे माजी संचालक आप्पासाहेब तेरदाळे, बाबा गाडवे, राजू आवगोंडा, बाळासाहेब कुरणे, के. जी. कांबळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोथळी येथील कार्यक्रमास संजय नांदणे, दानोळीचे उदय राऊत, रामचंद्र वाळकुंजे, कोथळीचे दिलीप मगदूम, नितीन वायदंडे, सागर बोरगावे, शितल पाटील, रवी पुजारी, मसाप्पा नंदीवाले, लक्ष्मण नंदीवाले, सर्जेराव नंदीवाले, दादू नंदीवाले, अर्जुन नंदीवाले, मानेश्वर नंदीवाले, बाजीराव नंदीवाले, संतू नंदीवाले, अनिल नंदीवाले यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.