Spread the love


शिरोळ : प्रतिनिधी :
शिरोळमधील युवा सामाजिक कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील परिवाराकडून शिरदवाड ते पंढरपूर पायी जाणाऱ्या वारकरी दिंडीचे स्वागत करून त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथून कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या कार्तिकी पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होतात. शिरोळ येथे या दिंडीचा एक मुक्काम होतो. येथील नदीवेस परिसरातील श्री राम सांस्कृतिक सभागृहात पायी दिंडीचा मुक्काम झाला.
सामाजिक कार्यकर्ते उल्हास पाटील, सौ. वेदांतिका पाटील, ह. भ. प. उत्तमराव पाटील, राजलक्ष्मी पाटील व परिवारातील सदस्यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी आयोजित केलेल्या वारकऱ्यांच्या प्रसादाचे वाटप शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव जाधव-सागले, चंद्रकांत गावडे, बाळासाहेब पाटील (शिरदवाड), शिरोळभूषण ह.भ.प बजरंग काळे, ह. भ. प. दिलीपराव माने, पिलासाहेब गावडे, शिवाजी काळे, डॉ. आप्पासाहेब पुजारी, रमेश पाटील, नितीन जगदाळे, मारुती जाधव, दत्तात्रय माने, महेश पाटील, राजाभाऊ काळे, विजय काळे, निवास जाधव, सर्जेराव कांबळे, तानाजी संकपाळ-शिलेदार, दीपक काळे, सचिन गावडे, उत्तम बिसुरे, विनायक मोरे, राजेंद्र गावडे, दिनकरराव पाटील तसेच श्री राम मंडळाचे सदस्य यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.