Spread the love


शिरोळ : प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हुंडाणे गावात बौद्ध समाजाचे कार्यकर्ते रोहित पठारे यांच्यावर करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी पक्ष व संघटनांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीचे निवेदन सोमवारी शिरोळच्या प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील यांना देण्यात आले. रोहित पठारे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच पीडिताला न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी तहसीलदार क्रांती पाटील यांनी निवेदनातील मागण्या व भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या घटनेमुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनामध्ये प्रमोद इनामदार,रमेश शिंदे, बाळासो कांबळे,संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी बाळासाहेब कांबळे,संतोष आठवले, धम्मपाल ढाले, सुरज शिंगे, जी.डी.चव्हाण,अनिल लोंढे, श्रीकांत शिंगाई, आदम मुजावर, सेनापती भोसले, सुरज कांबळे, आयुब पट्टेकरी,आप्पासो बंडगर,राजेंद्र प्रधान, विनायक कांबळे, विश्वास शिंगे, सुरेश कांबळे, किरण शिंदे ,चिंतामणी कांबळे, खंडेराव कांबळे,विक्रम माने,दिपक कांबळे,संजय कांबळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.