Spread the love


शिरोळ : प्रतिनिधी : हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे शिरोळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांनी शिरोळ पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा तात्पुरता पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली.
पदभार स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी विशाल पाटील यांचा शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी सत्कार करून स्वागत केले. पृथ्वीराजसिंह यादव यांनी मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी पदभार स्वीकारल्यामुळे शहरातील रखडलेले सर्व प्रश्न आणि समस्या मार्गी लागतील. कार्यालयीन कामकाज सुरळीत होऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असा विश्वास व्यक्त केला.
मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी कार्यालयीन कामकाजात गती देऊन शिरोळकर नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी पालिकेचे पदाधिकारी, प्रा.महेश कळेकर, स्वप्निल पाटील, अरुण कांबळे, प्रकाश कांबळे, लेखपाल मयूर मोहिते, नगर अभियंता ऋत्विक दुधाळ, कर निरीक्षक अशितोष प्रधान, साहिल लगीवाले, कनिष्ठ अभियंता सुहेब काजी, शहर समन्वयक साहिल मकानदार यांच्यासह पालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.