मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सीरिजनंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल. आयसीसी टूर्नामेंटनंतर मार्च पासून लगेचच आयपीएल 2025 ला देखील सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला 21 मार्च पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान आयपीएलमधील लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोटातून कर्णधारपदासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
विराट कोहली पुन्हा सांभाळणार RCB चं कर्णधारपद?
आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनपूर्वी आरसीबीने त्यांचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याला रिटेन केले नाही तसेच ऑक्शनमध्ये सुद्धा आरसीबीने त्याला खरेदी केले नाही. त्यामुळे आयपीएल 2025 साठी आरसीबीला त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे. विराट कोहली हा आगामी सीजनमध्ये आरसीबीचे नेतृत्व करू शकतो अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मिडीयातून समोर आली होती. दरम्यान आरसीबीचे उजज राजेश मेनन यांनी स्पोर्ट्स तकला आरसीबीच्या कर्णधारपदासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. मेनन म्हणाले की, ”सध्या आम्ही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आमच्या संघात 4 ते 5 लीडर खेळाडू आहेत. कर्णधारपदाबाबत अजून पर्यंत कोणताही विचार झालेला नाही की नक्की कोणाकडे नेतृत्व सोपायचे. आम्ही विचार करू आणि मग एका निर्णयावर पोहोचू”.
![](https://emahankarya.com/wp-content/uploads/2025/02/rcb.jpg)