Spread the love

श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन

नवी दिल्ली /महान कार्य वृत्तसेवा
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शानदार द्विशतक झळकावून इतिहास घडवला आहे. 38 वर्षीय ख्वाजा श्रीलंकेच्या भूमीवर द्विशतक झळकावणारा पहिला कांगारू खेळाडू ठरला आहे. त्याने 290 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने ही खास कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियन खेळाडूने 19 वर्षांनंतर आशियामध्ये झळकावले शतक
तत्पूर्वी, ख्वाजाने कर्णधार स्टीव्हन स्मिथसोबत तिसऱ्या विकेट्‌‍ससाठी 266 धावांची भागीदारी केली. ख्वाजाचे द्विशतक हे 19 वर्षांनंतर आशियात ऑस्ट्रेलियन खेळाडूचे पहिले द्विशतक आहे. यापूर्वी 2006 मध्ये नाईट वॉचमन जेसन गिलेस्पीने बांगलादेशविरुद्ध 201 धावांची इनिंग खेळली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 80 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
ख्वाजा गॅले येथे द्विशतक झळकावणारा 12वा फलंदाज
उस्मान ख्वाजाने स्मिथसह 266 धावांची भागीदारी केली. ही आता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी इतिहासातील दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. कॅनबेरामध्ये ट्रॅव्हिस हेड आणि जो बर्न्‌‍सची 308 धावांची भागीदारी ही चौथ्या विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी आहे. तसेच ख्वाजा आता गॅले येथील कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा 12वा फलंदाज ठरला आहे. तसेच या मैदानावर द्विशतक झळकावणारा तो सहावा परदेशी फलंदाज ठरला आहे.