व्हिडीओ पाहून सारेच झालेत अवाक्
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
टीम इंडियाचा धुरंधर वीरेंद्र सेहवाग सध्या चर्चेत आला आहे. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. वीरेंद्र सेहवागने त्याची मावस बहीण आरतीसोबत लग्नगाठ बांधली होती. पण आता त्यांच्यात दुरावा आला असून दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोघांनीही अद्याप घटस्फोटाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, दोघांचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याचा दावा करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वीरेंद्र सेहवाग त्याच्या पत्नीसोबत गाडीत बसल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान, वीरेंद्र सेहवाग फोनवर बोलत असल्याचं दिसतंय. तर, त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर राग दिसतोय. तसेच, दोघांमध्ये काय बोलणं झालं, ते ऐकू येत नाही, पण दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव फारच विचित्र आहेत.