Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सातत्याने होत आहे. मात्र, दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे.
धनश्री आणि चहलच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. दोघांचा घटस्फोट होत असल्याचा दावा केला जात आहे. चहल क्रिकेटमधून भरपूर पैसा कमावतो. युझवेंद्रची एकूण मालमत्ता 45 कोटी रुपये आहे. युझवेंद्र बँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही करोडोंची कमाई करतो. तर पत्नी धनश्री एक व्यावसायिक नृत्यांगना आहे. ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. धनश्रीलाही चांगले उत्पन्न मिळते. वास्तविक घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये सर्व काही न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असते. चहल आणि धनश्री या दोघांचीही आर्थिक स्थिती चांगली आहे. घटस्फोट झाला तरी धनश्रीला मालमत्तेत वाटा हवा की नाही हे तिच्यावर अवलंबून असेल. धनश्रीला चहलकडून पोटगी हवी असल्यास ती याबाबत न्यायालयात जाऊ शकते.
कोण आहे धनश्री वर्मा?
धनश्री वर्मा एक यूट्यूबर आहे. ती डान्सर, कोरिओग्राफर आणि एक सोशल मीडिया एन्फ्लूएंझरही आहे. यूट्यूबवर तिच्या डान्स व्हिडीओंनी लाखो व्ह्यूज मिळतात. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. धनश्री अनेकदा लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन करत व्हिडीओ पोस्ट करत असते.
धनश्री वर्माची एकूण संपत्ती किती?
धनश्री वर्माची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. वेगवेगळ्या बँड्‌‍सच्या जाहिराती करते. याच जाहिराती करण्याचे ती कोट्यवधी रुपये घेते. विशेष म्हणजे ती लवकरच एका दाक्षिणात्त्य चित्रपटात झळकणार आहे. दुसरीकडे युझवेंद्र चहलची संपत्ती 45 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. आयपीएल 2025 साठी युझवेंद्र चहलसाठी 18 कोटी रुपयांची बोली लागलेली आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या, आलिशान घर आहे. तोदेखील वेगवेगळ्या बँड्‌‍सच्या जाहिराती करतो.