मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मराठी कलासृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत तिच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मधुर आवाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. वैशालीने नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये तिने कलाकारांसाठी सरकारकडे खास मागणी केली आहे. तिने कलाकारांना पीएफ आणि पेन्शन न मिळण्यावर खंत व्यक्त केली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने ‘Music Podcast’ सुरू केलं आहे. त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलावलं जातं. याला प्रेक्षकांचा प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पॉडकास्टमध्ये वैशाली सामंतने हजेरी लावली होती. सावनीने ”आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत?” असं विचारल्यावर वैशाली सामंतने काही गोष्टींवर खंत व्यक्त केली आणि सरकारकडे खास मागणीही केली.
”सरकारने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. वैशाली म्हणाली, ”आपल्या कलाकारांना पीएफ मिळतो का? तर नाही, पेन्शन मिळते का? तर नाही. मला असे वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगनभरारी घेईल.”
पुढे वैशाली म्हणाली, ”आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडसं सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालावे. सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्यायला हवा. त्यांचा संपूर्ण आढावा देखील घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे. आता आपलं ण्दस्जूग्ूग्दह हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे.
आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवे. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे.” असे म्हणत वैशाली सामंत यांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणे गरजेचे आहे.