मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे एक्स सोशल मीडिया अकाऊंड हॅक झाल्याचे स्पष्ट झालेय. श्रेयाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सांगितलेय की अनेक प्रयत्न करुनही या उकाऊंटवर ती तिचा ताबा मिळवू शकलेली नाही.
आज 1 मार्च 2025 रोजी श्रेया घोषालने तिच्या इंस्टाग्रामवर तिचं एक्स उकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ”चाहते आणि मित्रांनो, नमस्कार. माझे ट्विटरएक्स अकाउंट 13 फेब्रुवारीपासून हॅक झालं आहे. मी एक्स टीमशी संपर्क साधण्यासाठी माझ्याकडून सर्वकाही प्रयत्न करून पाहिले. परंतु काही एआय प्रतिसादाव्यतिरिक्त, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मी माझे अकाउंट डिलीटही करू शकत नाही कारण मी आता लॉग इन करू शकत नाही. कृपया कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा त्या खात्यातून लिहिलेल्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. त्या सर्व स्पॅम आणि फिशिंग लिंक्स आहेत. जर उकाउंट परत मिळाले आणि सुरक्षित झाले तर मी ते स्वत: व्हिडिओद्वारे अपडेट करेन.”
यापूर्वी श्रेया घोषालनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्थूलपणाविरोधी मोहिमेला पाठिंबा देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती म्हणाली होती की, ”आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी स्थूलपणाविरोधी मोहीम सुरू केली आहे. आपला देश वेगाने प्रगती करत आहे आणि जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे, ही काळाची गरज आहे.”
