मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
भारतातील सर्वात मोठी चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी आपल्या महाराष्ट्रात आहे. मुंबईतील गोरेगाव येथे असलेली फिल्मसिटी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. तर, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची फिल्मसिटी हैद्राबाद येथे आहे. या फिल्मसिटीचे नाव रामोजी फिल्मसिटी असे आहे. यानंतर आता महाराष्ट्रात भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात फिल्मसिटी उभारली जाणार आहे. मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई प्रमाणाचे आता विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळणार आहे. रामटेकजवळ फिल्म सिटी उभारली जाणार आहे. यासाठी रामटेक जवळील 128 एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे. ही जागा 15 दिवसात हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल..
