नवरी मंडपात जाण्याआधीच लागली नजर
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या घरी सध्या लग्नाची चांगलीच गडबड सुरु आहे. अंकिता वालावलकर कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताच्या घरी लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अंकिताची मेंहदी आणि साखरपुडा काल पार पडला. दरम्यान, अशातच काल अंकिताच्या कारचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द अंकिता वालावकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. अंकिता वालावलकर काल रात्री 1 च्या सुमारास बाहेर गेली होती. तेव्हा तिच्या कारचा अपघात झाला आहे. कारच्या आरसा पूर्णपणे फुटल्याचे दिसत आहे. परंतु यात अंकिता कोणालाही कसलीही दुखापत झाली नसल्याचेही तिने सांगितले आहे. सुदैवाने सर्व काही ठीक असल्याचे तिने सांगितलं आहे.
अंकिताने तिच्या सोशल मिडियावरती अपघाताचा आणि कारचा पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये कारचा बाजूचा आरसा फुटलेला दिसत आहे. तर खाली कारला देखील स्क्रॅच पडल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर अकिंताने आम्ही सुरक्षित आहोत, परंतु नजर लागते हे खरं आहे, असं कॅप्शन दिलं आहे. ऐन लग्नाच्या धामधुमीत तिच्या कारचा अपघात झाला आहे. या घटनेने तिचे चाहते तिच्या काळजीत आहेत.