Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बिग बॉसच्या 18 व्या सीझनचा अंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून यंदाचा सिझन करणवीर मेहरा जिंकला आहे. गेल्या 14 वर्षांपासून बिग बॉसचं होस्टिंग अभिनेता सलमान खान करत आहे.मात्र आता यापुढे बिग बॉसचा होस्ट म्हणून सलमान दिसणार नाही.
बिग बॉस 18च्या महाअंतिम फेरीत सलमान खानने यापुढचा बिगबॉस सिझन होस्ट करणार नाही असा खुलासा केला आहे. सलमान खान गमतीने म्हणाला की, फायनलमधील स्पर्धकांना वाटत असेल की ते इथपर्यंत पोहोचले असल्याने जिंकण्यात किंवा हरण्यात काही अर्थ नाही, पण तसे अजिबात नाही. हे ऐकून सगळे हसू लागले. पुढे तो म्हणाला की, दररोज घरात राहणे खूप कठीण आहे आणि टॉप 6 मध्ये पोहोचलेल्या प्रत्येकाचा त्याला अभिमान आहे. मी सुद्धा शोचे 15-16 सीझन होस्ट केले आहेत. पण आता पुढचा सीझन करणं शक्य नाही.’ तसेच पुढे तो म्हणाला की, ‘मी खूप खूश आहे. आज स्टेजवर येण्याचा माझा शेवटचा दिवस आहे. विजेत्याचा हात उचलण्याची आणि माझी जबादारी पूर्ण करण्याची मी वाट पाहत आहे,’ असे सलमान म्हणाला. मात्र, सलमान हे मस्करीत म्हणाला की, खरंच तो हा शो सोडणार आहे याबद्दल प्रेक्षकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
सलमान खानने 2010 मध्ये सीझन 4 पासून हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली. मात्र, दरम्यानच्या काळात संजय दत्त, करण जोहर, अर्शद वारसी आणि अमिताभ बच्चन यांसारख्या इतर अनेक स्टार्सनीही हा शो होस्ट केला. पण चाहत्यांची पसंती नेहमीच सलमान खानच राहिला आहे.दरम्यान, गेले काही महिने सलमानसाठी खूप कठीण गेले आहेत. त्याची प्रकृती, लॉरेन्स बिश्नोईकडून सतत येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या या सगळ्यामुळे सलमानचं कुटुंब चिंतेत आहेत. मात्र असे असतानाही त्याने बिग बॉस 18 चे शूटिंग पूर्ण केले.