‘मी 7 वर्षांची होते तेव्हा स्मिता जी…’,
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांची अभिनय कारकीर्द जितकी चर्चेत आली नाही तितके त्यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले. राज बब्बर यांचे नाव घेतले की आपसुकच अभिनेत्री स्मिता पाटील हिचे नाव देखील समोर येते. भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या स्मिता पाटीलने राज बब्बरशी लग्न केले. राज बब्बरशी लग्न केले तेव्हा ते घटस्फोटीत होती. राज बब्बरचे पहिले लग्न नादिराशी झाले होते. त्यांना दोन मुले होती. मुलगी जुही बब्बर आणि मुलगा आर्य बब्बर.
आधीच विवाहित असल्याने राज बब्बर अभिनेत्री स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले. त्यानंतर 1983 मध्ये त्यांचं लग्न झालं. दुसऱ्या लग्नाआधी त्यांनी नादिराला घटस्फोट दिला होता. नुकतंच राज बब्बरची पहिली मुलगी जुही बब्बरनं वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयी सांगितले. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचं सत्य तिच्यापर्यंत कसं पोहोचले हे तिने सांगितले. याशिवाय त्यांनी राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्याबद्दलही सांगितले.
सत्य ऐकून हृदय तुटले
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा जुही फक्त सात वर्षांची होती. जुहीने लहरेन टीव्हीशी संवाद साधताना ही माहिती दिली. राज बब्बर यांनी स्वत: मुलीला त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. राज बब्बरने तिला आपल्या दुसऱ्या पत्नीबद्दल माहिती दिली तेव्हा ती फक्त सात वर्षांची होती. जुहीला खाली बसवले आणि तिला संपूर्ण प्रकार सांगितला. सत्य ऐकून तिचे मन दुखावले होते असे तिने सांगितले.
स्मिता पाटीलसोबत जुहीचे बॉन्डिंग
राज बब्बरने नादिराशी लग्न केले. त्यानंतर 1979 मध्ये जुही बब्बरचा जन्म झाला. यानंतर राज बब्बर अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईत आले आणि नादिराला तिच्या आईसोबत सोडले. 1981 मध्ये दोघांना आर्य हा मुलगा झाला. अभिनयाच्या दुनियेत काम करत असतानाच राज बब्बर स्मिता पाटील यांच्या जवळ आले. 1983 मध्ये त्यांनी लग्न केले. राज बब्बर यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांची पहिली पत्नी नादिराने त्यांची दुसरी पत्नी स्मितासोबतचे नाते चांगलेच समजून घेतलं होतं. विशेष म्हणजे त्यांची मुलगी जुही बब्बर आणि स्मिता पाटील यांचंही खूप जवळचं नातं होतं.
जुही आणि स्मिता पाटील यांची पहिली भेट
स्मिता पाटील यांची आठवण काढत जुही बब्बर म्हणाली की, ‘भीगी पालकें’च्या शूटिंगदरम्यान स्मिता पाटील यांना पहिल्यांदा भेटले. पहिल्या भेटीत भांडण झालं, नंतर हळूहळू ते जवळ आले. राज बब्बरचे स्मिता पाटीलसोबतचे संबंध नादिरासोबतच्या कोणत्याही वादामुळे नव्हते, असेही जुही बब्बरने स्पष्ट केले. ते नैसर्गिकरित्या तयार झालं होतं.
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांना प्रतीक बब्बर हा मुलगा आहे. प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर 15 दिवसांनी स्मिता पाटील यांचा बाळंतपणाशी संबंधित संसर्गामुळे मृत्यू झाला .
जुहीने सोनू निगमसोबत पदार्पण केले
जुही बब्बर देखील एक अभिनेत्री आहे. 2003 मध्ये ती सोनू निगमसोबत ‘कश आप हमारे होते’ या चित्रपटात दिसली होती. हा त्याचा डेब्यू चित्रपट होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर तो अपयशी ठरला. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर जुही बब्बरने टीव्ही अभिनेता अनूप सोनीसोबत लग्न केले आहे.