मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मराठी आणो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री लग्नानंतर मोठ्या आणि छोट्या पडद्यावरून दूर जातात. त्यानंतर काही अभिनेत्री कमबॅक करतात.अशीच लग्नानंतर करिअरपासून दुरावलेली लोकप्रिय अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
राज घराण्यातुन आलेल्या सागरिकाने भारतीय क्रिकेटपटूसोबत लग्न केलं होतं. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सागरिका 5 वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ती ‘ललाट’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाच्या सेटवरील फोटो सागरिकाने शेअर केलेत.सागरिका घाटगे या लूकमध्ये ओळखूच येत नाहीये. सागरिकाने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केलाय. या फोटोंमध्ये ती बंजारा समाजाच्या महिलांच्या लूकमध्ये दिसत आहे.
सागरिका घाटगे क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी आहे. दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. सागरिकाने ‘चक दे’ या चित्रपटात लक्षवेधी भूमिका केली होती. त्यानंतर ती अतुल कुलकर्णी यांच्यासोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटात दिसली होती. सागरिका घाटगे 2020 मध्ये ‘फूटपायरी’ या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर पाच वर्षांनी ती आता ललाट सिनेमात दिसणार आहे.