नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारी (बुधवार) पासून सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यापासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेचा पहिला सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडने दौरा सुरू होण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्यांचा नवीन उपकर्णधार जाहीर केला आहे. इंग्लंडने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हॅरी ब्रूकला त्यांचा नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
इंग्लंडचा संघ त्यांचा व्हाईट बॉल कर्णधार जोस बटलरच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध खेळेल, पण युवा फलंदाज हॅरी ब्रूक उपकर्णधार म्हणून दिसणार आहे. काही वर्षांतच ब्रूकने इंग्लंडसाठी खेळाच्या तिन्ही स्वरूपात स्वत:ची छाप सोडली आहे आणि त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला आता नेतृत्व पदावर स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द वर ट्विट करत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ब्रूकला पुरुष संघाचा नवीन उपकर्णधार म्हणून घोषित केले.