मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बॉलिवूडमधल्या सुपरडुपर कमाई करणाऱ्या अभिनेत्यांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण, बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे, जिनं कमाईच्या बाबत भल्या भल्या अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे. जिनं कमाईच्या बाबतीत मोठ्या दिग्गजांनाही पराभूत केलं आहे. सलमान, आमिर आणि शाहरुख खान या बॉलिवूडच्या तीन खान्सलाही तिनं अगदी सहज मागे टाकलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 बॉक्स ऑफिस गाजवतोय, पण या अभिनेत्रीसमोर तोदेखील पाणी कम चाय आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भल्या भल्या दिग्गज स्टार्सना पछाडणाऱ्या अन् एकापेक्षा एक असे हिट चित्रपट देणाऱ्या बॉक्स ऑफिस क्वीनला तुम्ही ओळखता का?
भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, बॉक्स ऑफिसवर कोणी आसपासही नाही…
एखादा सिनेमा हिट झाला की, नाही, हे कशावरुन समजतं, तर बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरुन. मग त्याची कथा कितीही चांगली असो किंवा गाणी धमाकेदार असो, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती चालतोय, किती रुपयांची कमाई करतोय यावरच तो चित्रपट यशस्वी ठरला की, नाही हे ठरतं. एखाद्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा चित्रपट किती चालणार? यावरुन त्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची किंमत ठरते. त्याच मेट्रिकनुसार, खान हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी सेलिबिटी आहेत. पण, या तिघांनाही पछाडणारी एक सौंदर्यवती आहे, जिनं बॉक्स ऑफिसवर थोडे थोडके नाहीतर तब्बल 10 हजार कोटी कमावले आहेत.
शाहरुख, सलमान आणि आमिर खाननं त्यांच्या करिअरमध्ये बॉक्स ऑफिसवर 7000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आणि तरीही, 10,000 कोटींचा टप्पा मोडण्यात यशस्वी झालेल्या अभिनेत्रीला ते पछाडू शकले नाहीत. भल्या भल्या दिग्गजांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर राज्य करणारी दिग्गज अभिनेत्री म्हणजे, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण. गेल्या दशकात, ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. अनेक भाषांमध्ये हिट चित्रपट देऊन या अभिनेत्रीनं सर्वात मोठ्या स्टार्समध्ये आपलं स्थान पक्कं केलं.