सलमानच्या विचित्र अटींविषयी वडील स्पष्टच बोलले
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बॉलिवूडचा भाईजान सध्या त्याच्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे चर्चेत आहे. सलमानला येणाऱ्या धमक्यांमुळे तो चिंतेत आहे. सलमान खान हा असा अभिनेता ज्याचे फिल्म करिअर दमदार राहिले पण त्याचे वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिले. सलमानच्या फिल्मपेक्षा त्याच्या अफेअर्सच्या खूप चर्चा झाल्या. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचे नाव जोडले गेले. ठरलेले लग्न मोडण्यापासून ते वयाच्या साठीतही सिंगल राहण्यापर्यंतचा सलमानचा प्रवास काही सोपा नव्हता. तो लग्न कधी करणार याची वाट पाहून अनेकजण थकले. सलमान खान अजूनही सिंगल का आहे? त्याला नेमकी कशी बायको हवी आहे हे स्वत: त्याचे वडील सलीम खान यांनी सांगितले. सलीम खान लेकाबद्दल आणखी काय म्हणाले?
कोमल नाहटासोबतच्या बोलताना सलमानचे वडील सलीम खान यांनी अभिनेत्याने लग्न का केले नाही याविषयी सांगितले. सलीम खान म्हणाले, ”सलमान खानचे काय आहे माहिती नाही. त्याच्या विचारात थोडासा विरोधाभास आहे हे त्याचे लग्न न करण्याचे खरे कारण आहे. कमिटमेन्टनंतर तो त्याच्या अटी घालायला सुरुवात करतो.”
”सलमानची आसक्ती किंवा प्रेम तो ज्या व्यक्तीसोबत काम करतो त्याच्याकडे तो आकर्षित होतो. हे लोक खूप उत्साही आणि सुंदर दिसतात. ते काम करताना बोलतात आणि जवळच्या वातावरणात राहतात म्हणून जवळ येतात. तर 90टक्के वेळेस ती चित्रपटाची नायिका असते”, असेही सलीम खान म्हणाले.
सलीम खान म्हणाले, जेव्हा सलमान एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये येतो तेव्हा तो तिच्यामध्ये आईचे गुण शोधण्याचा प्रयत्न करतो. सलमान करिअर-ओरिएंटेड महिलेने आपल्या महत्त्वाकांक्षा सोडून केवळ घरातील कामांवर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा करतो हे चुकीचे आहे. मी त्याच्याशी लग्न करून त्याला घरी सेटल करेन म्हणून कोणी यापासून वंचित का राहावे? त्याच्या बाबतीतही असेच घडते.ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा एखादी कमिटमेन्ट असते, तेव्हा तो ती बदलण्याचा प्रयत्न करतो. तिच्यात त्याची आई शोधतो. ते शक्य नाही. काम करणाऱ्या अभिनेत्री मुलांना शाळेत घेऊन जाणे, त्यांना त्यांच्या गृहपाठात मदत करणे किंवा त्यांच्यासाठी दुपारचे जेवण तयार करणे यासारखी कामे करू शकत नाही.