मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर नुकतेच सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अशातच आता बॉलीवूडमधले चार दिग्गज कलाकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर संकट आल्याचे दिसून येत आहे.
कॉमेडियन कपिल शर्माला, अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसुझा आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कपिलसह त्याच्या कुटुंबालाही मारण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धमकीचा पाकिस्तानशी कनेक्शन
कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुंगधा मिश्रा या कलाकारांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला असल्याचा अंदाज दिला जात आहे. तसेच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला जर 8 तासात प्रतिसाद मिळाला नाही तर, कारवाई करणार असे लिहले आहे.