बारामती / महान कार्य वृत्तसेवा
पावसानं राज्यासह बारामतीत जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन इमारती पावसानं खचल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी इमारतींचीही पाहणी केली. साईरंग, ॠषिकेश आणि श्री समर्थ या इमारतींमधील सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आले आहेत. वर्षाच्या सरासरीच्या निम्मा पाऊस एकदिवसात झाला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवारांनी केली पाहणी : बारामतीमध्ये रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक शेजारील तीन इमारती पावसानं खचल्या आहेत. या इमारतींची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. साईरंग, ॠषिकेश आणि श्री समर्थ अशी या इमारतींची नावे आहेत. सद्यस्थितीत सर्व इमारतीमधील फ्लॅट हे रिकामे करण्यात आले आहेत.
शेतात शिरलं पाणी : बारामतीमधील लिमटेक येथे निरा डावा कालवा फुठला होता. यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या शेतात आलं होतं. अजित पवार यांनी याचा देखील आढावा घेतला. रविवारी बारामतीत 227 मिलिमीटर पाऊस पडला होता. यानंतर अजित पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी लगेच बारामतीत दाखल झाले.
वर्षाच्या सरासरीच्या निम्मा पाऊस एकदिवसात झाला : अजित पवार – पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना याबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत, असे अजित पवार यांनी सांगितलं. वर्षाच्या सरासरीच्या निम्मा पाऊस एकाच दिवसात झाला असल्याचंही ते म्हणाले. तसंच अजित पवार यांनी बारामतीकरांना न घाबरण्याचं आवाहन केलं.
