Spread the love

वेतवडे पैकी मुसलमानवाडीतील जमिनचे झाले भुस्खलन ; शेतीचे मोठे नुकसान

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील नदीवर असलेल्या आंबर्डे पुलावरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बरगे काढताना चांगलाच घोटाळा झाला.या नदीच्या तिरावर असलेल्या वेतवडे पैकी मुसलमनावाडीच्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे येधील ‘शेतकऱ्यांची बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था झाली आहे.

पन्हाळा तालुक्यातील धामणी नदीवर आंबर्डे येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा तात्कालीन आमदार स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील यांच्या पुढाकारने साकरण्यात आला.पण उन्हाळ्यात आंबर्डेच्या पुढील नदीपात्रात मुबलक पाणी असते. पण मागील नदीपात्रात पाणी नसल्याने पात्र कोरडे पडते.परिणामी येथील शेती जगवायची कशी असा प्रश्न उभा राहत असे. यावर उपाय म्हणुन कुंभी धरणातील पाणी महत्त्वकांक्षी बँकवाँटर योजनेमुळे धामणी नदीपात्रात आणले जाते. यामुऴे आंबर्डे बधाऱ्यातुन पाणी मोटार पंपाच्या सहाय्याने पश्चिमेकडे आणले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात धामणी नदी आंबर्ड्यातुन उलट्या दिशेने वाहते.

सध्या मान्सुनपुर्व पावसाने पावसाळ्याची झलकच दाखवुुुन दिल्याने धामणी नदीचे पात्र कधी नव्हे ते मे महिन्यात तुडुंब भरले आहे.नदीचे पाणी नदीकाठच्या शेतीत देखील घुसले होते.याकारणाने बंधाऱ्याला नुकसान होवु नये याखबरदारीसाठी बंधाऱ्याचे बरगे काढण्यात आले खरे.पण त्यामुळे पाण्याला आपली वाट मोकळी झाल्याने अतिशय वेगाने पाणी प्रवाहित झाले.त्याचा परिणाम मुसलमानवाडीच्या शेतजमिनत साचलेल्या पाणी देखील वेगाने खाली नदीपात्रात सरकले .त्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनीचे भुस्खलन झाले. यामध्ये नदीकाठची जमीनीला मोठ-मोठ्या भेग्या पडल्या. शिवाय झाडे उनमळुन पडली आहेत.

शेतकऱ्यांनी पाणी उपसा सठी बसवलेले विद्युत मोटारी देखील जमिनीत गाडले गेले आहेत. सेच काहीठिकाणी नदीपात्राची रुंदी वाढली आहे. यामुळे बरगे काढताना घोळ झाला असुुन शेतकऱ्यांच्या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होत आहे. तरी या घटनेची दखल घेवुन योग्य त्या उपाय योजनासह नुकसानीचे पंचनामे होवुन तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱी वर्गाच्याकडुन करण्यात आली आहे. दरम्यान पहिल्याच पावसात भुस्खलनाचा धोका निर्माण झाल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर या घटनेमुळे हलगर्जीपणा करुन चालणार नाही,असाच संदेश मिळत आहे.