रूकडी / महान कार्य वृत्तसेवा
रुकडी महान कार्य वृत्तसेवा येथे रात्री बाराच्या दरम्यान अचानक गॅसच्या स्फोट झाल्याने ७८ वर्षीय वृद्ध महिलेचा भाजून मृत्यू झाला. या स्फोटात तीच राहत घर उध्वस्त झाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की” हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे मराठी शाळेजवळ एका छोट्याशा खोलीमध्ये ७८ वर्षीय पार्वती आण्णासो आंबोळे एकट्याच राहात होत्या. त्या गोळ्या बिस्किट विकत आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान मध्य रात्री १२ च्या दरम्यान अचानक स्फोटाचा मोठा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या राहुल बागडी , दिपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर , सदस्य शीतल खोत, सचिन इंगळे , पोलीस पाटील कविता कांबळे , यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हातकलंगले . पोलीस ठाण्याला माहिती दिली.
यावेळी झालेला स्फोट इतका मोठा होता की घराच्या भिंतीं कोसळून पडल्या तर पत्रे आणि इतर सामान ही जळून खाक झाले होते . ग्रामस्थांनी आग विझवून आंबोळे यांना वाचवता येईल का या साठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना अपयश आले. या स्फोटात आंबोळे यांचा झोपल्या ठिकाणीच भाजून मृत्यू झाला होता. दरम्यान यावेळी हातकणंगले पोलिसांनी ही तत्काळ घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास ए.पी.आय यादव करत आहेत.
