Spread the love

अध्यक्ष मोहन काळे यांची माहिती 

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा

स्वातंत्र्याचे झाले काय ? अन् आमच्या नशिबी आले काय ? असा संताप व्यक्त करीत त इचलकरंजी शहरातील 500 पारधी समाज आपल्या न्याय हक्कासाठी बुधवार 28 रोजी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत .अशी माहिती आदिवासी पासेपारधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांनी दिली.

आदिवासी फासे पारधी समाज सध्या अनेक अडचणी तून मार्गक्रम करीत आहे जातीचे दाखले यास कोणत्याही सामाजिक सुरक्षा समाजातील लोकांना मिळत नाहीत यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत परंतु महापालिका आमच्या मागण्या दुर्लक्षित करते.लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.अशा या बेजबाबदार निष्क्रिय कारभारामुळे आदिवासी समाज विकासकामांपासून कोसो दूर आहे.

 त्यामुळे आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे काळे यांनी सांगितले. 

या आहेत मागण्या

1 राहत्या ठिकाणी महानगरपालिकेने आदिवासी विभागास प्रस्ताव पाठविल्याप्रमाणे त्वरीत घरकुल बांधून मिळावेत. 

२) प्रभाग क्र. २० मध्ये आदिवासी फासे पारधी समाजाच्या दोन ठिकाणी झोपडपट्टी असून झोपडपट्टी फाळा पावती लावणे व त्वरीत वीज कनेक्शन देण्यात यावीत.

३) प्रत्येक वर्षी ‘ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना’ अंतर्गत वार्षिक ४० लाखांचा निधी असतो परंतु या संदर्भात महानगरपालिका कार्यालयाने कोणताही

विकास कामाचा निविदा आदिवासी विभागास सादर न केल्यामुळे असा प्रत्येक वर्षातील निधी परत जातो. 

४) आदिवासी फासे पारधी समाजाला विकास कामांच्या प्रवाहात इचलकरंजी महानगरपालिका आणणार आहे की नाही याची लेखी माहिती  मिळावी.