ॲडव्हान्स घेतलेले दलाल अस्वस्थ?
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
राजकीय आशीर्वादाने मुदत संपूनही ठाण मांडून बसलेली हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना समिती अखेर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बरखास्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अनपेक्षित आदेशामुळे प्रकरण मंजूर करतो म्हणून भोळ्या भाबड्या निराधार जनतेकडून ऍडव्हान्स उचल केलेले दलाल मात्र चांगलेच कासावीस झाल्याची चर्चा तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत होती.
हातकणंगले संजय गांधी निराधार योजना समिती नियुक्तीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती समिती नियुक्त करताना खासदार गटाने अन्य सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यावेळी झाला होता परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना बळ द्यायचं म्हणून या नियुक्ती होती ठाम राहीले. त्यानंतर विधानसभा निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला आणि या समितीची मुदत संपली होती परंतु ची भूमिका म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काही काळासाठी जिल्ह्यातील सर्व समित्यांना मुदतवाढ दिली होती. या मुदत वाढीचा चुकीचा अर्थ लावून आता आमची कायमस्वरूपी समिती आहे या अविर्भावात पदाधिकारी वावरत होते.
दरम्यानच्या काळात जनसुराजचे अशोकराव माने आमदार म्हणून विजयी झाले. त्यांच्या समर्थकांकडून या समितीवर दावेदारी सुरू झाली. शिवसेनेकडील हे पद गेले तर आमदार ताकद लावतील म्हणून खासदार गटाने आहे अशीच परिस्थिती ठेवण्यासाठी प्रयत्न केले. सहा महिने याला यश ही आले परंतु ही कमिटी बरखास्त करावी कुणाची मक्तेदारी ठरू नये यासाठी एक यांचं कार्यरत झाली होती अशी चर्चा समिती बरखास्त झाल्यानंतर रुकडी, माणगाव परिसरात आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचार ही ही समितीत बरखास्त होण्यामागील कारण असू शकते. असेही या निमित्ताने बोलले जात आहे.
ॲडव्हान्स परत द्यावा लागणार ?
मागील अडीच वर्षात समितीचा कारभार दलालांच्या आणून चालू आहे अशी कुजबूज होती समिती बरखास्त झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात हे आता उघडपणे लोक बोलत असल्याचे कळते या समितीमध्ये काम करताना निरपेक्ष भावनेने काम केलं पाहिजे याचा विसर पडल्याचे हे ही ऐकिवात आहे. पुढील महिन्यात पेन्शन मंजूर करतो म्हणून काही दलालांनी ऍडव्हान्स घेतल्याची ही चर्चा या निमित्ताने सुरू झाली असून हे दलाल कोण यांना पाठबळ कुणाचं अशी उलट सुलट चर्चाही या निमित्ताने सुरू झाली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार भोवला?
विधानसभा निवडणुकीत संजय गांधी कमिटी अध्यक्ष झाकीर भालदार यांनी काँग्रेस आमदार राजू बाबा आवळे यांचा उघड प्रचार केल्याने महायुती मधील सर्व नेते चिडून होते व आमदार विनय कोरे यांनी ही याबाबत नाराजी व्यक्त केली होती या कारणामुळे खासदार धैर्यशील माने ही झाकीर भालदार यांच्यावर नाराज होते. अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
