filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 46;
Spread the love

प्रथमच मे महिन्यामध्ये बंधारा पाण्याखाली वाहनधारकांची गैरसोय 

कनवाड / महान कार्य वृत्तसेवा 

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राजापूर बंधाऱ्यातून अलमट्टीकडे 17500 क्युसेक  पाणी विसर्ग होत आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे कधी नाही ती कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना तसेच चांदोली धरण-पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असून कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीलगत शेतीच्या पाण्यासाठी असणाऱ्या विद्युत मोटरी काढण्याची लगबग वाढली आहे. तर जनावरांच्या चाऱ्यासाठी लावण्यात आलेले गवत पाण्याखाली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

एकंदरीत सध्या पावसाची रिप रिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळी झाल्याचे चित्र शिरोळ तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. 

सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या वेळची पाणी पातळी पुढील प्रमाणे

सांगली आयर्विन पूल पाणी पातळी पंधरा फूट, म्हैसाळ बंधारा 24 फूट, नृसिंहवाडी 32 फूट दोन इंच, राजापूर बंधारा 21 फूट, राजापूर बंधारा येथून पाण्याचा विसर्ग 17 हजार पाचशे क्युसेक याप्रमाणे आहे.