Spread the love

कुपवाड मिरज रस्त्यालगत एकास चाकूने भोकसले.?

मिरज / महान कार्य वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यात चालू वर्षात खुनाची मालिका सुरूच आहे. कुपवाड एमआयडीसी परिसरातील मेनन पिस्टन चौकात महिन्याभरापूर्वी खून झाला होता. तोपर्यंत मिरज एमआयडीसीत खून झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालय इमारतीचे उद्घाटन होऊन ३ दिवस झाले. पोलिस यंत्रणा जबाबदारीने कामाचा श्रीगणेशा करणार आहे. तोपर्यंत मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च या कंपनीच्या पाठीमागील परिसरात असणाऱ्या शिवशक्तीनगर भागात एकाचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना समोर आली आहे.

प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, मिरज कुपवाड रस्त्यालगत असणाऱ्या शिवशक्ती नगर परिसरात एकाचा चाकूने भोगसून खून केला आहे. यामध्ये श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय २९ रा.भोसे,ता.मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज सोमवारी पहाटे घडली. खून करून मारेकरी फरार आहेत. खुनाचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मयत श्रवणेशनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केला. मदत कार्यासाठी आयुष हेल्पलाइनचे टीम प्रमुख अविनाश पवार, चिंतामणी पवार, अभिषेक आंबे हे होते. याबाबत अधिक तपास कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम करीत आहे.