Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

सादळे – मादळे (ता.करवीर) येथील घाटात महिंद्रा पिकअप पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जोतिबा देवाचे  दर्शन घेऊन  सादळे मादळे मार्गे कासारवाडीच्या दिशेने पुणे बेंगलोर महामार्गांकडे येणाऱ्या घाटातील युटर्न वळणावर महिंद्रा पिकअप पलटी झाली. व जिनिसेस कॉलेजच्या  बाजूला असलेल्या कंपाउंडमध्ये अडकली. या अपघातात चालकासह तिघेजण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हे चौघेजण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून  शनिवारी रात्री जोतिबा दर्शनासाठी महिंद्रा पिकप घेऊन आले होते. रविवारी सकाळी जोतिबाचे दर्शन घेऊन मंगळवेढ्याकडे परत जाताना सादळे – मादळे येथील घाटातील यु आकाराच्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली. स्थानिक प्रवाशांनी व पर्यटकांनी गाडीतून जखमीना बाहेर काढून गाडी सरळ केली.