कोगनोळीत भाजपा कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेत मागणी
कोगनोळी / महान कार्य वृत्तसेवा
कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांच्या संदर्भात कोगनोळी ग्रामपंचायत सत्ताधारी गटाकडून दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी कोगनोळी येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत सर्वांचे स्वागत विजय भिवाजी पाटील यांनी केले यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सुनील माने म्हणाले की, सन 2017 -18 या सालामध्ये योग्य लाभार्थींची यादी करून त्यांचे जीपीएस करण्यात आलेले आहे या जीपीएस करण्यात आलेल्या घरांची यादी नुकतीच मंजूर झालेली आहे. यामध्ये यामध्ये अल्पसंख्यांक व जनरल या लाभार्थ्याची निवड करण्यात आली असून, यामध्ये अल्पसंख्यांक लोकांच्या करिता 55 घरे व सर्वसामान्यांच्या करिता 65 घरे मंजूर झालेली आहेत. या लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचाच आधार घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभांमध्ये राज्य सरकारचा कोणताही सहभाग नसल्यामुळे सत्ताधारी गटाकडून या घरांचे प्रमाणपत्र वाटप करत असताना लाभार्थींची दिशाभूल करणे थांबवावे अशी मागणी आम्ही करत असल्याचे सांगितले.
तर यावेळी बोलताना कोगनळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील म्हणाले की, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या” पंतप्रधान आवास योजना “या योजनेतून कोगनोळी साठी 120 घरे मंजूर झालेली आहेत. या घरांच्या मंजुरी पत्राचे वितरण हे शासकीय नियमानुसार कोगनोळी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये होणे गरजेचे आहे ते अन्यत्र कुठे झाल्यास त्याचा वेगळा विचार केला जाईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. ग्रामपंचायत सदस्य विद्याताई व्हटकर व सुनील माने , व सौ वंदना सचिन चौगुले यांनी ग्रामपंचायती कार्यालयांमध्ये ग्रामविकास अधिकारी व अकाउंटंट यांना सूचना देऊन ग्रामपंचायत कार्यालया खेरीज कुठेही प्रमाणपत्र वाटू नये याकरिता आम्ही निपाणी तालुका पंचायत एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर यांना व पीडीओंना निवेदन देणार असल्याचेही सांगितले.
हे प्रमाणपत्र घेत असताना कोणीही आर्थिक मागणी केल्यास त्या संदर्भात आर्थिक व्यवहार करू नये. असे आव्हानही या पत्रकार परिषदेत सुनील माने यांच्याकडून करण्यात आले. या पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य विद्याताई हटकर, सौ वंदना चौगुले रंगराव कागले प्रकाश पवार शकील नाईकवाडे अरुण पाटील ओंकार हंचीनाळे संजय जाधव अजित पाटील महेश कोळी बबलू पाटील नितीन धनवडे विलास नाईक सर रणजीत कोळेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार कुमार व्हटकर यांनी मानले.
