Spread the love

जोतिबा / महान कार्य वृत्तसेवा

श्री क्षेत्र जोतिबा  येथील पाणीपुरवठा करणारा मुख्य ट्रान्सफर बिघडलेला होता अशावेळी भर पावसात सुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता सौ.राजश्री प्रभु यांनी तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर मागवून घेऊन जोतिबा  येथील पाणीपुरवठा सुरळीत केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार खुद्द ग्रामपंचायती ने केला. सेवा देणाऱ्या दोन्हीही शासकीय यंत्रणेच्या समन्वयामुळे कोणतीही समस्या दूर होते यांची प्रचिती आली.

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील पाणी पुरवठा सुविधेमध्ये अनेक अडचणी येतात कधी पाणी पुरवठा वीज बील थकीत मुळे पाणी पुरवठा बंद केला जातो, तर कधी पाईप लाईन फुटणे , तांत्रिक अडचणी मुळे पाणीपुरवठा सेवा ठप्प पडते. पाणी असते त्यावेळी वीज नसते तर काही वेळेला वीज असते पण पाण्याची कमतरता असते. पाणी आणि वीज हे एकमेकांशी पुरक आहेत . दोन्ही असेल तरच पाणी पुरवठा सुरळीत होतो. आता ग्रामपंचायत प्रशासनाला विद्युत वितरण कंपनीची मदत होत असल्याने दोन्ही मधील युती आता पाणी पुरवठा खंडीत होण्याची भिती दुर करणारी ठरली आहे. नुतन ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल  भोगण माजी ग्रामपंचायत अधिकारी  शिवाजीराव पाटील यांनी विद्युत वितरण कंपनी च्या कनिष्ठ अभियंता राजश्री प्रभू यांचा पाणीपुरवठा साठी तत्परतेने केलेल्या सेवेबद्दल सत्कार केला.