Spread the love

कुंभोज / महान कार्य वृत्तसेवा

कुंभोज येथील हातकलंगले रोडवरील हिंगलजे  मळ्यात व नाजिकचा पिंटू चौगुले यांच्या मळ्यात भंगार गोळा करणाऱ्या महिलांकडून तांब्याचे हंडा, एम एस सी बी चे काही साहित्य तर श्रेणिक हिंगलजे यांच्या विहिरीवरील मोटरीसाठी आणलेले फिल्टरसाठी जाळी चोरताना येथील नागरिकांनी पकडले. यावेळी कूंभोजचे महिलांनी त्या चोरी करणाऱ्या महिलांना बेदाम चोप दिला आणि हातकलंगले पोलिसांना पाचारण करून त्यांच्या ताब्यात या महिलांना देण्यात आले.

कुंभोज मध्ये यापूर्वीही अपोला आईस्क्रीमच्या ठिकाणी याच महिलांनी चोरी करताना सापडल्याचे नागरिकांतून चर्चा चालू होती. चोरीमध्ये एमएससीबीचे साहित्य होते. पण घटनास्थळी एमएससीबीचे कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते.