Spread the love

भालचंद्र पाटील की डी. ए. पाटील नेमके अध्यक्ष काेण?

सांगली / महान कार्य वृत्तसेवा     

दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी भालचंद्रपाटील आणि डी. ए. पाटील यांची नांवे त्यांच्या त्यांच्या समर्थकसभासदांकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण भारत जैन सभेचे नेमकेअध्यक्ष काेण? अशी गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सांगली येथे रविवारी झालेल्याबैठकीत जाेरदार शाब्दिक वाद आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारघडल्याने समाजामध्ये अध्यक्षाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यकारीमंडळाची रविवारी महावीरनगर सांगली येथील दिगंबर जैन बाेर्डींग लक्ष्मीबाईजिनगाेंडा पाटील सभागृहात सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखालीविविध विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यामध्ये सन 2025-28 या कालावधीसाठी दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षनिवडीचा विषयही हाेता. अध्यक्षपदासाठी दाेन नांवाची प्रामुख्याने चर्चा असल्यानेत्यावरुन घमासान हाेण्याची शक्यता वर्तविली गेली हाेती. त्यामुळे अध्यक्ष काेण हाेणारयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले हाेते.       

दक्षिण भारत जैन सभेचे 86 सभासद असूनसभासदांनाही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. आगामीकालावधीच्या अध्यक्षपदासाठी प्रामुख्याने भालचंद्र पाटील आणि डी.ए.पाटील यांच्या नांवाची चर्चा हाेती. बैठकीच्या स्थळी येणाèया सभासदांना ओळखपत्र पाहूनच आत साेडले जात हाेते. परंतु सभासद असताना व ओळख पटविली असतानाही डी. ए. पाटील यांना बाहेर राेखण्यात आले. सभागृहात जे सभासद उपस्थित हाेते. त्यामध्ये भालचंद्र पाटील व डी. ए. पाटील यांचे समर्थक उपस्थित हाेते.       

अध्यक्ष निवडीच्या विषयावर चर्चा हाेताना त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील, डी. ए. पाटील आणि संजय कणेकरयांची नांवे समाेर आली. त्यावर मतदान घेणे गरजेचे असताना आवाजी मतदानाचा घाटघालण्यात आला. त्यामध्येही दाेन्ही पाटलांच्या नांवाने आवाजी मतदान घेतले गेले. परंतु दाेन्ही बाजूच्या समर्थकांनी भालचंद्र पाटील व डी. ए. पाटील यांच्यानावाची अध्यक्षपदासाठी निवड जाहीर केल्याने त्याठिकाणी गाेंधळाची परिस्थितीनिर्माण झाली. त्यातून दाेन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद हाेऊन एकमेकांच्याअंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

दाेन्ही बाजूकडून अध्यक्षपदासाठीनावाची घाेषणा करत त्यांचा निवडीबद्दल सत्कारही करण्यात आला. या गाेंधळातचभालचंद्र पाटील यांच्या सर्मथकांनी अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची घाेषणा करतसभागृह साेडले. गाेंधळाची व हातघाईपर्यंत प्रकरण गेल्याने पाेलिसांनीही मध्यस्थीकरण्याचा प्रयत्न केला. पण काेणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे गाेंधळ आणि वादावादीत अध्यक्षपदासाठी दाेघांच्या नावाची घाेषणा करण्यात आल्यामुळे दक्षिण भारतजैन सभेचे अध्यक्ष काेण? असा सवाल उपस्थित हाेत आहेत. अधिकृतपणे अध्यक्षपदी काेणाचीनिवड झाली हेच समजेनासे झाल्याने गाेंधळ उडाला आहे.      

 डी. ए. पाटील हे गत चारदशकांपासून वीर सेवादलाच्या माध्यमातून समाजासाठी कार्यरत आहेत. त्यांनीआजपर्यंत त्यांच्यावर साेपविलेल्या जबाबदाèया त्यांनी समर्थपणे पेलल्या आहेत. तर अवघ्यासहा महिन्यांपूर्वी उपाध्यक्ष असलेले भालचंद्र पाटील यांच्याकडे द.भा. जैन सभेचेअध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची धुरा साेपविण्यातआली हाेती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी डी. ए. पाटील हेच याेग्य असून तेचअध्यक्ष असल्याची चर्चा समाजबांधवातून व सभासदांतून व्यक्त केली जात आहे. 

129 वर्षात प्रथमच…       

दक्षिण भारत जैन सभेच्या 129 वर्षाच्या इतिहासातआजवर जे घडले नाही ते यंदा प्रथमच घडले. अध्यक्ष निवडीत यंदा राजकारण आल्याचेदिसून आले. सभेचे 9 कमिटी सदस्य असताना अध्यक्ष निवडीवरुन 1 विरुध्द 8 असे चित्रदिसून आले. पैशाचा वारेमाप वापर करण्यासह सभासदांना आपल्या बाजूनेओढण्यासाठी त्यांना आंबा, काेल्हापूरसह विविध ठिकाणी तीन ते चारदिवसांपासून ठेवण्यात आले हाेते. सभेच्या आजवरच्या इतिहासात असा प्रकारपहिल्यांदाच घडल्याने विराेधकांबद्दल समाजात तीव्र नाराजीचा सूर असल्याचे दिसून येतआहे.