Spread the love

रिमझीम पावसात तरुणाईची रेलचेल

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

ऐन उन्हाळ्यात पावसाळी पर्यटनासाठी पन्हाळागड हाऊसफुल झाला असून शनिवारी रविवारी सुट्टी गाठून हौशी पर्यटकांनी गडकोट फुलून गेला आहे.सोसाट्याचा वारा,दाट धुक्के अन् रिमझीम पावसात तरुणाई पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद पन्हाळागडाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

कोल्हापुर पासुन अवघ्या वीस किमी अंतरावर आणि सर्वसामान्य खिशाला परवडणाऱ्या पन्हाळ्याला पर्यटक आवार्जुन भेट देतात.पण सध्या सर्वत्र मान्सुनपुर्व पावसाने आपला मुक्काम पन्हाळ्यासह परिसरात ठोकला आहे. त्यामुळे अगदी ऐन मे महिन्यात पावासाळ्याचे मोसम तयार झाले आहे.येथील चारदरवाजातुन आल्याआल्या येथील सेल्फी पाईंट,वीरशिवा काशिद पुतळा येथे भे देत,जकात नाक्याच्या येथे प्रवासी कराची पावती फाडुन पर्यटक पन्हाळ्यात एंट्री करत आहेत.आल्याआल्याच येथील निसर्गरम्य वातावरणाने खरंच आपण पन्हाळ्याला आल्याचे पैसे फिटले असे भाव पर्यटक व्यक्त करत आहे.

तीन दरवाजा, अंधारबाव व दोन्ही मधील असलेल्या तटबंदीच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर येथील धान्याचे कोठार, सज्जाकोठी, पुसाटी बुरुज, वारेबुरुज, लता मंगेशकर बंगला, आकाशवाणी टाँवर परिसर, इदगाह मैदान येथे देखील पर्यटक मनसोक्त आनंद साजरा करताना दिसत आहे. काही पर्यटक वाहनाने तर काही जण गाडी लावुन अशा वातावरणात पायी पावासात भिजुन तटबंदी वरुन फिरताना दिसत आहेत. अनेक जण या स्वर्गाच्या अविष्काराचे दुश्य आपल्या कँमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोसेशन, सेल्फी, व्हिडीओ काढताना पर्यटक अरक्षश:मग्न झाले आहेत. असा थंडगार वातावरणात गरमा गरम झुणका-भाकर, कोल्हापुरी मिसळ, वडापाव, पावभाजी, रगडा, भेलपुरी, शेवपुरी, चहा, काँफी याचा मन सोक्त आस्वाद पर्यटक घेत आहेत. तर यातील काहीजण तोंड चालु ठेवण्यासाठी स्वीटकाँनर शेंगदाण्, फुटाणे यासह करवंदी, जांभुळ यांना देखील पसंती देत आहेत. तर काहीजणाना कडुन घरगुती खानावळात तांबड्या-पांढऱ्या रस्स्या, चिकन, मटण यावर ताव मारताना दिसुन येत आहेत. त्यामुळे पन्हाळ्यातील छोटे मोठे स्टाँल्स, घरगुती खानावळ, हाँटेल्स मध्ये गर्दी दिसुन येत आहे. तसेच लाँजिग फुल्ल झाले असुन गाईंड लोकांचा व्यवसाय देखील तेजीत चालु आहे. तरी पर्यटकांच्या वाढत्या गर्दी मुळे जागोजागी वाहतुकी कोंडीचा बोजवारा उडाला आहे. असे असले तरी यामुळे नगरपरिषदेच्या प्रवासी करात मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. एकुणच काय तर पन्हाळ्याला अनपेक्षित तयार झालेल्या वातावरणाने उटी, काश्मिर, दार्जिलिंगच्या वातावरणाची अनुभती येत असल्याने पन्हाळगड हाऊस फुल्ल झाला आहे.

चौकट

अनेक राजवटीचा अविभाज्य घटक, मराठ्याच्या दैदिप्यमान इतिहासाचा मानकरी, निसर्गाचे वरदान अशी पन्हाळ्याची ओळख सर्वदुर आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी ही नेहमीच. पण  सध्या मे महिन्याची सुट्टी आणि खास करुन पन्हाळ्यात पडलेली धुक्याची झालार, रिमझिम पाऊस, थंड गार वाहणारा वारा अशा आल्हादायक वातावरण आणि शनिवार व रविवारची शासकीय सुट्टी यामुळे पन्हाळा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.