Spread the love

प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून  युवतीशी शारीरीक संबंध ठेवून त्याचा व्हिडीओ बनवून घरच्यांना  पाठवण्याची  धमकी देत  विवाह बाहेर ठरवल्यास घरच्यांना सोडणार नाही  अशी धमकी दिल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी सुरज सलीम शेख (वय १९, रा. लालनगर,) याला अटक केली आहे.

वसई (ता.पालघर) येथे खाजगी नोकरी करणाऱ्या पिडीत युवतीची जुन २०२४ मध्ये इन्स्टाग्रामवर सुरज शेख याच्याशी ओळख झाली आणि त्यातून दोघांच्यात मैत्री झाली. जुलै २०२४ मध्ये पिडीत युवती सुरजला भेटण्यासाठी इचलकरंजी आली होती. त्यावेळी सुरजने तिला सावत्रभाऊ बादल याच्या मित्राच्या खोलीवर तसेच सप्टेंबर २०२४ मध्ये कोल्हापुर रस्त्यावरील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधून शारीरीक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडीओ केला. सुरजने हा व्हिडीओ नातेवाईकांना शेअर करण्याची धमकी देत वारंवार शारीरीक संबंध ठेवले तसेच तुझा विवाह बाहेर ठरवला तर घरच्यांना जिवे ठार मारण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात सुरज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सुरजला अटक करुन न्यायालयात हजर केले असता ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली. सुरज याच्या विरोधात यापूर्वी बी.एन.एस. ११८ (१) नुसार गुन्हा दाखल आहे.