महापालिका निवडणुका जिंकण्याचा मार्ग मोकळा
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)
शुक्रवारी विविध विकासकामांच्या उद्घाटन लोकार्पण आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीत उपस्थिती लावली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असणाऱ्या केऐटीपी मैदानावर झालेल्या या सभेने इचलकरंजी शहर आणि परिसर संपूर्ण भाजपमय झालेला दिसून येत होता. तर सभेचे यशस्वी नियोजन केल्याने युवा आम डॉ.राहुल आवाडे यांच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तब झाल्याचे पाहायला मिळाले नजीकच्या काळात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या सभेच्या निमित्ताने अनेक इच्छुक नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सभेला हजेरी लावली होती. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिका वर मार्ग लावण्याचा मार्ग या सभेच्या माध्यमातून मोकळा झाल्याचे दिसून आले एकूणच आजची सभा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक चैतन्य निर्माण करून देणारी ठरली.
सातशे कोटीहून अधिक विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इचलकरंजीत हजेरी लावली होती. या सभेच्या नियोजनासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे डॉक्टर आमदार राहुल आवाडे तसेच शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी परफेक्ट नियोजन केले होते. या नियोजनाचा फलित या सभेच्या यशस्वी ते दिसून आले. आगामी महापालिकाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही सभा अत्यंत महत्त्वाचे ठरणारे ठरले. या सभेचा उत्साह आणि लक्षणे उपस्थिती पाहता येणाऱ्या किंवा नजीकच्या काळात भारतीय जनता पार्टी पक्ष किंबहुना यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश करतील याचे प्रत्येक सभेमुळे दिसून आले. या सभेच्या निमित्ताने आमदार डॉक्टर राहुल आवारे यांनी महापालिकेसाठी शड्डू ठोकल्याचे दिसून आले असून कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची आणि पहिला महापौर भाजपचाच करायचा असे वातावरण या सभेच्या निमित्ताने बाकी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इचलकरंजीत होणारी सभा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करायची, यासाठी आमदार आवाडे यांनी गेल्या काही दिवसांपासून मोठे परिश्रम घेतले होते. हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मंडळात स्वतंत्र बैठक घेऊन सभेचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर सरकार यांना सोबत घेऊन आमदार आवाडे यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. त्याला या सभेच्या निमित्ताने यश आल्याचे पाहायला मिळाले. एकूणच इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुका भाजपमय झाल्याचा प्रत्यय या निमित्ताने आला.
