Spread the love

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

पन्हाळगडच्या प्रवेश द्वार चार दरवाजा येथील साधोबा तलावाचा जिर्णद्वार काम  संथ गतीने सुरू असून तलावाच्या दक्षिण बाजूचा भराव पावसाने निसटू लागल्याने त्यावरील प्रवाशी कर नाका इमारतीसह मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. तातडीने काम पूर्णत्वास नेवून पुढील अनर्थ टाळावा अशी लोकांची मागणी आहे. तर गडाच्या प्रवेशद्वार रोडवर तट बंदीतून आज सकाळी मोठा दगड पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेले सात दिवसापासून पन्हाळागड आणि बांधारी परिसरात पावसाने थैमान घातला आहे. या पावसाने पडझडी होऊ लागल्या आहेत. असाच पाऊस राहिला तर भूस्खलन च्या घटना होणार आहेत.

पन्हाळगडच्या प्रवेश द्वार चार दरवाजा येथील साधोबा तलावाचा जिर्णद्वार काम चार  महिन्या पासून संथ गतीने सुरू असून तलावाच्या दक्षिण बाजूचा भराव शनिवारी सकाळी निसटला. तात्काळ तो भराव बाजुला कारणाचे काम चालू करण्यात आले असले तरी त्यावर प्रवाशी कर नाका इमारत आहे. कधी नाका इमारत कोसळून दुर्घटना होऊ शकते. तसेच रोडचा भागा देखील ढासळून दुर्घटना होऊ शकते. याची संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी नोंद घेऊन उपाययोजना आखून तलावाचे काम तातडीने पुर्णत्वास न्यावे असे सर उमटत आहेत.