इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील जेष्ठ पत्रकार आणि वृतपत्र विक्रेते चिदानंद आलूरे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाच्या झटक्याने राहत्या घरी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपद ही भूषविले होते. शालेय जीवनापासून त्यांनी वृतपत्र विक्री व्यवसाय सुरु केला होता.तर तरुण भारत बेळगाव या दैनिकाचे तसेच नंतरच्या काळात दैनिक जनप्रवासचे इचलकरंजी प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई आणि आई असा परिवार आहे.
