महापालिकेच्या जनसंपर्कने घातला गोंधळ
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे)
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाची महापालिकेने निमंत्रण पत्रिका तयार केली. मात्र या पत्रिकेत शिरोळचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांचे नाव वगळण्यात आले. यासंदर्भात भाजपाच्या काही कार्यकर्त्यां ही बाब सोशल मिडियावर व्हायरल केल्ा. कुणाच्या सुपीक डोक्यातून हा प्रकार घडाल असा संताप व्यक्त झाल्यानंतर महापालिकेच्या जनसंपर्क विभागाला जाग आली. आणि दुपारनंतर नव्याने दुरुस्त निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली.
दरम्यान पहिल्यांदा झापण्यात आलेल्या पत्रिकेचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून देवू नये, ज्या अधिकाऱ्याने ही चूक केली आहे. महिन्याच्या 1 तारखेला न चुकता पगार घेतो, त्याच्या पगारातून कपात करुन घ्यावी, अशी मागणी प्रामाणिकपणे न चुकता 31 मार्च पूर्वी कर भरणाऱ्या इचलकरंजी वाशियातून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत जय्यत तयारी सुरु आहे. भव्यदिव्य कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली होती. परंतु काही नावे वगळून निमंत्रण पत्रिका प्रसारीत करण्यात आली. त्यामुळे संतापाची एकच लाट उसळली.
