सावर्डे / महान कार्य वृत्तसेवा
दहा एचपी वरील कृषी पंप धारकांची वीज बिले माफी व कनेक्शन तोडू नयेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने पुरुषोत्तम धारकांची वीज बिले माफ करून मोफत वीज देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिली होती सध्या दहा एचपी वरील शेतकऱ्यांची बीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरण कडून सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान होत आहे.
राज्य सरकारने संपूर्ण वीज माफी चे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विज बिल भरलेली नाहीत यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नसून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन राज्य सरकारने पाळावे व सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात यावी, तसेच महावितरण ने वीज तोडणी कनेक्शन थांबवावी अन्यथा स्वाभिमानी संघटने कडून महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन वडगाव येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यालयात माननीय अभियंता महामुनी यांना स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष माननीय धनाजीराव पाटील यांच्यावतीने देण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी जिल्हा संपर्कप्रमुख अण्णा मगदूम जिल्हा सरचिटणीस प्रवीण घोरपडे स्वाभिमानीचे कार्यकर्ते गणपतराव वाघ अंकुश पाटील भीमराव मगदूम सुकुमार चौगुले जयसिंग कुरणे वैभव कुंभार तसेच परिसरातील संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
