पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
गेली दोन तीन दिवस शिरोली-नागाव परिसराला वळवाच्या पावसाने झोडपून काढले आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्यावरील गटारी तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत नागाव येथे इंदिरा झोपडपट्टी वसाहत आहे. यांतील बरीच घरे महामार्गात गेली आहे. या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे दोन तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सेवा रस्त्यावरील पाणी साठल्यामुळे पाणी निचरा होण्यास वाव नसल्यामुळे थेट झोपडपट्टीतील घरामध्ये घुसले आहे. या साचलेल्या पाण्यातच राहावे लागत असल्याने व ये जा सुरू असलेने रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याआधी रस्ते महामंडळांने पाणी निचरा करण्याची गरज आहे.तसेच नागाव ग्रामपंचायत ने सुद्धा यामध्ये लक्ष घालून पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तसेच याठिकाणी तात्काळ औषध फवारणी करून नागिरीकांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
याबरोबरच शिये फाटा ते सांगली फाटा येथील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. गटारी पाण्याखाली गेल्याने वाहनधारकाना गटारीचा अंदाज न आल्याने वाहनांच्या अपघात होण्याची शक्यता आहे . या गुढघाभर पाण्यातून वाहनधारकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत.
