Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

नागाव ता.हातकणंगले येथे सिटीझन सिंडिकेट कन्सल्टंटीच्याच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री प्रथमच नागाव मध्ये येत आहेत. या कार्यक्रमाला  पालकमंत्री प्रकाश आबिटकरसो,  मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती असणार  आहे.

 याबरोबर आमदार सतेज पाटील, विनयरावजी कोरे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर यांची सन्माननिय उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.

शुक्रवार दि.२३ मे २०२५ रोजी  सायंकाळी ५ वाजता नागाव फाटा येथे नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन आयोजक सुमलेश मानसी, मधुकर कांबळे यांनी केले आहे.