इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
आजच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक वगैरे करताना आपण सजग राहणे ही काळाची गरज आहे. काेणतीही गुंतवणूक करताना ती आपण मान्यताप्राप्त ठिकाणी करताे काय, वारस नोंद करताे काय, अशा गाेष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबराेबर आर्थिक व्यवहार करताना त्यामध्ये फसवणूक, सायबर ्राॅड हाेऊ शकताे काय, प्रलाेभन आहेत काय यांचे भान आपण ठेवले आहे काय अशा सर्व दृष्टीने सजग राहणे आवश्यक असते. कारण आपला कष्टाचा पैसा काेणत्याही प्रकारे वाया गेला तर आर्थिक नुकसानीबराेबरच मानसिक स्वास्थ्यही बिघडते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आर्थिक नियाेजनकार व सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार साै. प्रियदर्शिनी मुळ्ये (रत्नागिरी) यांनी केले.
येथील मनाेरंजन व प्रबाेधन व्याख्यानमालेत उत्तम जगण्यासाठी आर्थिक नियाेजन या विषयावर त्या बाेलत हाेत्या. आपल्या
दृकश्राव्य पद्धतीने सादर केलेल्या माहितीपूर्ण भाषणात मुळ्ये यांनी एकूणच आर्थिक नियाेजन करताना काेणत्या प्रकारे विचार करावा आणि काळजी घ्यावी याची तपशीलवार मांडणी केली. उत्तम आर्थिक जगण्यात आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता व स्वतंत्रता हे सर्व घटक येतात. पैसा हे साधन आहे उद्दिष्ट नव्हे याचेही भान आपण ठेवायला हवे, कारण पैशाच्या मागे लागण्यास काेणतीही सीमा नसते. जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने पैसे हाताळणे म्हणजे आर्थिक नियाेजन हाेय आणि आजच्या बदलत्या काळात याची खूप गरज आहे. कारण पूर्वीच्या काळी आपल्या उत्पन्नात स्थिरता हाेती, शिवाय वृत्ती खर्चिक नव्हती तसेच बाह्य प्रलाेभने कमी हाेती. आज बाजारवादाच्या जगात उत्पन्नाचे स्त्राेत वाढले त्याचबराेबर खर्चही वाढले आणि अनेक प्रलाेभने आपल्या समाेर येत आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
स्वतःचा आर्थिक स्वभाव ओळखून आपले बजेट तयार करावे आणि ऐच्छिक खर्चाचे भान ठेवावे. कुटुंबातील सर्वांबराेबर आर्थिक चर्चा करावी आणि त्यांनाही सजग करावे. त्याचबराेबर इतरांशी विनाकारण स्वतःची तुलना करू नये. लवकर ायदा मिळवून देणाèया याेजनांच्या पासून दूर राहावे तसेच अनावश्यक कर्ज घेण्याबाबत सावध राहावे. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक नियाेजनाचे व्यवस्थापन लांबणीवर टाकू नये, वेळेवर करावे, अशा आशयाचा सल्लाही त्यांनी दिला.
